Vande Bharat  saam tv
देश विदेश

वंदे भारतचे तिकिट खूपच स्वस्त, रेल्वेमंत्र्यांनी मांडलं गणित; चीन, जपान अन् फ्रान्सचा दाखला देत म्हणाले...

Vande Bharat AC Chair Car ticket price per kilometer : वंदे भारत एक्सप्रेसचे एसी चेअर कार तिकीट दर चीन, जपान आणि फ्रान्सपेक्षा कमी असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत केला.

Namdeo Kumbhar

Vande Bharat latest News : वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाचे दर हे इतर देशांच्या तुलनेत स्वस्तच असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेय. लोकसभेत दिलेल्या लेखी निवेदनात रेल्वेमंत्र्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचे तिकिट हे चन, जपान आणि फ्रान्स या देशातील ट्रेन्सपेक्षा स्वस्त असल्याचं म्हटलेय. त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर वंदे भारतच्या तिकिटाच्या किंमतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

वंदे भारत एसी चेअर कारचे भाडे ३००-४०० किलोमीटरसाठी २.१९ रुपये प्रति किलोमीटर इतके आहे. हे तिकिटाचे दर चीन, जपान आणि फ्रान्स या देशात समान सेवांच्या भाड्यामध्ये खूपच कमी आहे. करण या देशामधील समान सेवेसाठी प्रति किलोमीटर ७ ते २० रूयये इतके भाडे आकारले जाते, असे रेल्वे मंत्री म्हणाले. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी तिकिटाची किंमत ठरवताना काय विचार केला जातो, याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालय विविध प्रकारच्या प्रवासी सेवांच्या भाडे ठरवतात. सेवेचा खर्च, सेवेचे मूल्य, देऊ केलेल्या सेवा आणि सुविधांचा प्रकार, परवडणारी क्षमता, इतर स्पर्धात्मक पद्धतींमधील स्पर्धा आणि सामाजिक-आर्थिक बाबींचा योग्य विचार केला जातो.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. तेव्हापासून आतापर्यंत देशात ८२ मार्गावर १६४ वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवा सुरू आहेत, असे रेल्वे मंत्री म्हणाले. वंदे भारत एकसप्रेसमध्ये सुधारित सस्पेंशन सिस्टम, सेमी-हाय-स्पीड ऑपरेशन्ससह जलद प्रवेग, स्वयंचलित प्लग दरवाजे, एर्गोनॉमिक सीट्स, मिनी पेंट्री, सीसीटीव्ही आणि कवच यासारख्या सुविधा आहेत. परवडणारी क्षमता लक्षात घेऊन, या गाड्यांची भाडे रचना सेवेच्या किमतीपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय रेल्वे दरवर्षी ७.२ अब्जाहून अधिक प्रवाशांना परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा पुरवते. भारतीय रेल्वेची भाडे रचना सामाजिक-आर्थिक घटकांना विचारात घेते. जगभरातील विविध रेल्वे प्रणालींनी स्वीकारलेल्या संबंधित सर्वोत्तम पद्धतीसारखी आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे भाडे सर्वात कमी आहे. वंदे भारत गाड्यांमध्ये भाड्यात कोणतीही सवलत नाही. पण प्रत्येक रेल्वे सेवेच्या चेअर कारमध्ये चार जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT