Vande Bharat Train: Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे खूपच जबरदस्त, रेल्वेकडून संपूर्ण प्लान तयार, प्रवाशांना नेमक्या काय सुविधा मिळणार?

Vande Bharat Train: रेल्वे प्रवास स्लीपर वंदे भारत ट्रेनची आतुरतेने वाट पाहणार आहे. ही ट्रेन लवकरच रूळावर धावणार आहे. ही ट्रेन खूपच जबरदस्त असणार आहे. यामध्ये प्रवाशांना नेमक्या काय सुविधा मिळणार हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणणार

  • या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा मिळणार आहेत

  • फायर सेफ्टी, सीसीटीव्ही आणि पॅनिक बटणांसारख्या सुविधा बसवल्या जाणार

  • ट्रेनचा वेग १६० किमी प्रतितास असेल

रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, सुखकारक आणि आरामदायी व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेत वंदे भारत ट्रेन आणली. या ट्रेनला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील अनेक मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहे. आता प्रवाशांच्या सेवेत लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन येणार आहे. सर्व प्रवासी या ट्रेनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

वंदे भारत स्लीपर ट्रेनला अधिक आरामदायी बनवण्यासाठी रेल्वेला अनेक सूचना मिळाल्या आहेत. बोर्डाने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनला यावर विचार करण्यास सांगितले आहे. मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ट्रेनला मंजुरी देताना अनेक सुरक्षा उपाय नमूद केले आहेत. यामध्ये अग्निरोधक केबल्स, सहज उपलब्ध होणारे पॅनिक बटणे आणि वायरिंग फॉल्ट डिटेक्शन डिव्हाइसेस यांचा समावेश यामध्ये आहे. वंदे भारत स्लीपरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि आराम वाढविण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत असे सांगितले जात आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि क्रॅश-हार्डन मेमरी मॉड्यूलसारख्या प्रणालींसाठी विशेष केबल्स वापरणे अनिवार्य केले आहे. जेणे करून ट्रेनला लागणाऱ्या आगींच्या घटनांपासून प्रवासी वाचू शकतील. गेल्या वर्षी दरभंगा ट्रेन आगीतील शोधातून मिळालेल्या आर्क-फॉल्ट डिटेक्शन डिव्हाइसेसची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या एसी कोचमधील एअर-कंडिशनिंग डक्ट्स जमिनीच्या कोपऱ्यांपासून अधिक योग्य ठिकाणी हलविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

सध्या वरच्या बर्थच्या मागे लपलेले आपत्कालीन अलार्म बटणे प्रवाशांना दिसावीत अशाठिकाणि लावण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेसच्या आगामी प्रकारांसाठी आरडीएसओ मानक सूचना तयार करेल. यामुळे ट्रेनमध्ये आग आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यास आणखी बळकटी मिळेल. यासेबतच, बोर्डाने झोनल रेल्वेला १६० किमी प्रतितास वेगाने १६ कोच स्लीपर रॅक चालविण्यास मंजुरी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला? मराठीचा सन्मान असेल तर भेंडी बाजारात जा

Peer Benefits: थंडीत पेर खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

Monday Horoscope : जुनाट विकार डोके वर काढणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल तब्येतीची काळजी

मुंढवा जमीन प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक

Indigo Chaos Hits Maharashtra: इंडिगोचा घोळ, मंत्री-आमदारांना फटका, नागपुरात जाण्यासाठी नेत्यांची धावपळ

SCROLL FOR NEXT