Railway: रेल्वेचा जम्बो प्लान! मुंबईसह महाराष्ट्रातील ८ रेल्वे टर्मिनसवर सुविधा; लांबपल्ल्याच्या प्रवाशांना होणार फायदा

Maharashtra Railway 8 Terminus Holding Area: महाराष्ट्रातील ८ रेल्वे टर्मिनसवर आता होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Railway
RailwaySaam Tv
Published On
Summary

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबईतील ८ रेल्वे टर्मिनसवर उभारणार होल्डिंग एरिया

प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्यासाठी निर्णय

नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत लाखो प्रवाशांना रेल्वेने प्रवास केला. लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान,दिवाळीत खूप जास्त गर्दी होते.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होते. अनेकदा रेल्वे उशिराने येतात किंवा रद्द होतात. या काळात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, आता रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे.

Railway
Railway News: रेल्वे प्रवाशांची लवकरच गर्दीतून सुटका, १५ डब्यांची लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

महाराष्ट्र ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया

महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. देशातील एकूण ७६ टर्मिनसवर हा होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळी, छठ पूजा, दसरा या कालावधीत लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, अनारक्षित ट्रेनसाठी टर्मिनसवर खूप गर्दी होते. या प्रवाशांना थांबण्यासाठी होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. जेणेकरुन प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होणार नाही.

Railway
Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

यंदा दिवाळी आणि छठपूजेसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला होता. यामुळे खूप फायदा झाला. याच पार्श्वभूमीवर ७६ टर्मिनसवर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे.

होल्डिंग एरियामध्ये काय असणार? (What is Holding Area)

होल्डिंग एरिया म्हणजे प्रवाशांनी थांबण्यासाठीचे ठिकाण. या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतील. याचसोबत शौचालय, मेडिकल बूध, मदत कक्ष, प्रवाशांनी थांबण्याची व्यवस्था केली जाईल.

या ठिकाणी होल्डिंग एरिया (Holding Area Terminus)

हा होल्डिंग एरिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरदेखील उभारण्यात येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल, नागपूर, नाशिक रोड, पुणे, दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या ठिकाणी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे.

Railway
Railway News: रेल्वे प्रवाशांची लवकरच गर्दीतून सुटका, १५ डब्यांची लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com