Vande Bharat train used for the first-ever human heart transport from Surat to Ahmedabad, saving a life in a critical transplant operation. saam tv
देश विदेश

वंदे भारत ठरली 'देवदूत'!! मानवी हृदय सुरत ते अहमदाबाद २ तासांत पोहोचवून रचला इतिहास

Vande Bharat Train Used For Heart Transport In India First Time: वंदे भारत ट्रेन ठरली ‘देवदूत’! सूरत ते अहमदाबाद अवघ्या अडीच तासांत मानवी हृदय पोहोचवून इतिहास रचला. अवयवदानामुळे चार रुग्णांना मिळाले नवजीवन.

Omkar Sonawane

गुजरातच्या सूरत येथील सरकारी रुग्णालयात ऑडिशामध्ये 36 वर्षीय मिथुन स्वाईन यांच्या अवयव दानामुळे चार रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. त्याच्या दोन किडनी, यकृत आणि हृदयाचे यशस्वीरीत्या दान करण्यात आले आहे. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील सिद्धपूर कलाखडी गावचे रहिवासी असलेले मिथुन स्वाईन हे सुरतच्या किम परिसरात लुम फॅक्टरीमध्ये काम करत होते. 28 जुलैला त्यांची अचानक प्रकृती बिघडली. घरी बसल्या बसल्या त्यांच्या चेहऱ्याचा भाग तिरका झाला, तसेच डावा हात आणि पायाला मुंग्या येऊ लागल्या आणि पूर्णपणे काम करणे बंद केले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यान पुढे न्यु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

सिव्हिल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती अजूनच खालावली. शेवटी 30 जुलैला डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केले. यानंतर अवयव दान चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयव दानाचे महत्व पटवून दिले. पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी समाजासाठी प्रेरणादायी निर्णय घेत अवयवदानास संमती दिली. अवयव दानाच्या प्रक्रियेनुसार दोन्ही किडनी आणि लिव्हर अहमदाबाद येथील आयकेडीआरसी येथे पाठवण्यात आले. मात्र हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टमूले हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होतो. सध्या गुजरातमध्ये पावसाने हाहाकार माजला असून हे ह्रदय वेळेत पोहोचवणे रुग्णालय प्रशासनासाठी मोठे आव्हान होते. त्यामुळे रुग्णालयाने ह्रदय रेल्वेमार्गाद्वारे अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतला. जो देशातील पहिलाच प्रयोग ठरला.

रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने दोन तासांत ह्रदय सुरक्षितपणे अहमदाबादला पोहोचवण्याचे ठरवले. कारण ह्रदय चार तासांच्या आत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते.

देशात पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनमधून हृदय पाठवले

रेल्वे प्रशासन आणि डॉक्टरांच्या संयुक्त प्रयत्नाने यश आले. अवघ्या अडीच तासांत ह्रदय अहमदाबादला पोहोचले आणि दुसऱ्या रुग्णावर यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. देशात पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनद्वारे ह्रदय वाहतूक करण्याची ऐतिहासिक कामगिरी यावेळी साध्य झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 92 टक्के भरलं

Rasika Sunil: हिरवी साडी अन् मोहक अदा; 'नॅशनल क्रश' रसिका सुनीलचा ग्लॅमरस लूक

Ajit Doval : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

Bone Health : कमी वयातच हाडं का कमकुवत होतात? जाणून घ्या या ५ गंभीर चूका

भाजप सोडताच बड्या नेत्यानं मागितला थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT