Valentine Week Condom Sales Report Saam Tv
देश विदेश

Valentine Week 2026 : फुलापेक्षा कंडोमची विक्री जास्त, व्हॅलेंटाईनला भारतीयांनी मोडला विक्रम, वाचा

Valentine Week Condom Sales Report : व्हॅलेंटाईन वीकमध्ये भारतात कंडोम आणि इंटिमेट प्रॉडक्ट्सच्या विक्रीने २०२५ चा विक्रम मोडला आहे. ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान विक्रीत तिपटीने वाढ झाली असून बॉडी केअर आणि मेकअप वस्तूंचीही मोठी मागणी नोंदवली गेली आहे.

Alisha Khedekar

  • व्हॅलेंटाईन वीकमध्ये कंडोम विक्रीचा विक्रम

  • २०२५ च्या तुलनेत तिपटीने वाढ

  • ऑनलाईन विक्री कंपनीचा अहवाल चर्चेत

  • बॉडी केअर व मेकअप वस्तूंनाही मोठी मागणी

तरुणाईचा सगळ्यात आवडता आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक नुकताच पार पडला. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गुलाबाच्या फुलांसह अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू दिल्या. धक्कादायक म्हणजे या भेटवस्तूंपेक्षा भारतात सर्वात जास्त कंडोमची विक्री झाल्याचं अहवालात समोर आलं आहे. या वर्षी,कंडोम उत्पादनांच्या विक्रीने २०२५ चा विक्रमही ओलांडला आहे.

प्रगत तंत्रज्ञानामुळे बाजारातील सगळ्या वस्तू अगदी घरपोच आपल्याला मिळतात. यासाठी अनेक कंपन्या सध्या कार्यरत. यातील काही ऑनलाईन कंपन्यांचा व्हॅलेंटाईन विकचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यापैकी क्विककॉमर्स अॅप्सच्या ताज्या अहवालानुसार, ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीचे आकडे खूपच धक्कादायक आहेत.

तसेच इन्स्टामार्टच्या अलीकडील अहवालानुसार, २०२५ च्या तुलनेत या वर्षी व्हॅलेंटाईन डेला लोकांनी तिप्पट जास्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची ऑर्डर केली. मात्र फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूच नाही तर, मेकप आणि बॉडी केअर सारख्या वस्तूंची देखील एका आठवड्यात मागणी वाढली होती असून त्याच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली.

अहवालानुसार, व्हॅलेंटाईन वीकमध्ये बाथ, बॉडी आणि मेकअपच्या वस्तू सर्वाधिक खरेदी केल्या गेल्या आहेत. तसेच एकाच वेळी ग्राहकांनी जवळपास १० ते १५ हजारांच्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या असल्याचं समोर आलं आहे. खरेदी विक्रीच्या या अहवालात कंडोमचा नंबर अव्वल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT