Garba Viral Video Saam
देश विदेश

ती मांडीवर बसली, त्यानं हवेत उचलून KISS घेतला; गरब्यातील प्रतापामुळे कपलला देश सोडावा लागला, VIDEO व्हायरल

Garba Viral Video: वडोदऱ्यातील युनायटेड वे गरबा मैदानावर कपलचा किस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट.

Bhagyashree Kamble

  • गरबा मैदानावर कपलचा प्रताप.

  • किसचा व्हिडिओ व्हायरल.

  • सोशल मीडियावर संताप.

वडोदराच्या प्रसिद्ध युनाटेड वे गरबा मैदानावरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसून येत आहे. जोडप्यानं ट्रडिशलन आऊटफिट घातलं आहे. गरबा खेळत असताना त्यांनी व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत जोडपं चुंबन घेत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियात व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. मैदानात गरबा खेळत असताना चुंबन घेणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोक या जोडप्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे.

जोडप्यानं माफी मागितली

वृत्तानुसार, हे कपल एनआरआय असल्याची माहिती समोर आली आहे. या कपलचा चुंबन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अटलादरा पोलीस ठाण्यात जोडप्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर जोडप्यानं अटलादरा पोलीस ठाण्यात जाऊन मैदानावरील असभ्य वर्तवाबद्दल लेखी माफी मागितली.

माफी मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे जोडपं ऑस्ट्रेलियाला परतले. नवरात्रीच्या वेळी हे जोडपे वडोदराच्या मंजलपूर येथे त्यांच्या वडिलांच्या घरी भेटण्यासाठी आले होते. ही महिला ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका आहे. तर, तिचा नवरा शाळेचा मालक आहे. या जोडप्याचे १६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत.

त्यांनी या व्हिडिओवरून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माफी मागितली. एनआरए जोडप्यान माफी मागितली असली तरी, कायदेशीर कारवाई न झाल्यानं जनतेत संतापाची लाट उसळली आहे. नेटकरी सोशल मीडियावर पोलिसांविरूद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांना 50 लाख रुपयांची मदत

Mumbai : ठाकरे-शिंदेच्या दसरा मेळाव्यामुळे मुंबईत वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

GK: भारतातील कोणते शहर 'सायकल सिटी' म्हणून ओळखले जाते? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; २५७० पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

SCROLL FOR NEXT