Organic Oasis restaurant: नवीन दुकान असो किंवा हॉटेल असो उद्घाटनाला मोठी सेलिब्रेटी किंवा नेता येणार हे ठरलेलंच असते. अनेकदा अशा उद्घाटनांच्या कार्यक्रमांसाठी सेलिब्रेटींना पैसेही द्यावे लागतात. मात्र सध्या उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) एका रेस्टॉरंटच्या उद्घाटनाची सर्वत्र चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे या रेस्टॉरंटचे उद्घाटन चक्क गाईच्या हस्ते करण्यात आले आहे. काय आहे या हटके रेस्टॉरंटची कथा, चला जाणून घेवू.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये (lucknow) एक खास आणि जरा हटके रेस्टॉरंट सुरु झाले आहे. जिथे लोकांना नाश्त्यापासून ते रात्रीचे जेवण अगदी ऑर्गेनिक पद्धतीचे मिळते. म्हणजे लोकांना चवीबरोबर आरोग्यदायी फायदे मिळतात. इतकेच नाहीतर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांसाठी ज्यूस, स्प्राउट्ससह फास्ट फूडप्रेमींना ऑर्गेनिक पिझ्झा, बर्गरचीही चव चाखता येते.
सर्वात विशेष म्हणजे या रेस्टॉरंटचे उद्घाटन मंत्री किंवा सेलिब्रेटीने नव्हेतर चक्क गाईच्या हस्ते करण्यात आले आहे. गायीने रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी व्हीआयपी गेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. जिचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागतही केले.अनेकांना हा उद्घाटन सोहळा फार आवडला आहे. या सोहळ्यासाठी नटलेली व्हीआयपी गेस्ट गायीने तर सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
ऑरगॅनिक ओएसिए असे या हटके आणि चर्चित रेस्टॉरंटचे नाव असून उत्तर प्रदेशचे माजी डीएसपी शैलेंद्र सिंह यांनी या रेस्टॉरंटची सुरूवात केली आहे. नावाप्रमाणेच हे रेस्टॉरंट अनेक कारणांनी खास ठरणार आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये सर्व गोष्टी ऑर्गेनिक मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार असून जे बेरोजगार आहेत तेही या रेस्टॉरंटसाठी डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करु शकतील. तसेच ग्राहकांनाही घरबसल्या ऑर्गेनिक फूड खायला मिळणार आहे.
याबद्दल माहिती देताना शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, "हे रेस्टॉरंट सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आजकाल अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये फास्ट फूड महागड्या दरात मिळते, या फूडमुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे आम्ही लोकांना वाजवी दरात ऑर्गेनिक फूड देणार आहोत."
तसेच त्यांच्या या हटके स्टाईल उद्घाटनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "गाय ही जगाची माता मानली जाते. यामुळे एखाद्या गोष्टीचे उद्घाटन गाईने करणे देखील शुभ असते. त्यामुळेच गाईच्या हस्ते उद्घाटन केले." दरम्यान या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत असून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.