उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबद्दल एक महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी. गेल्या १७ दिवसांपासून ४१ मजूरांचा बाहेर पडण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि त्यांच्या सुटकेसाठी राबणाऱ्या हातांना, बचावपथकाला, अखेर यश आले असून आज १७ व्या दिवशी कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. उर्वरित कामगारांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामगारांच्या सुटकेने त्यांच्या घरी येण्याची वाट पाहत असलेल्या कुटुंबीयांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला.
दिवाळीच्या दिवशी सकाळी बोगद्याचं काम सुरु असताना मातीचा ढिगारा खाली आला आणि ४१ कामगार आत अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी गेल्या १७ दिवसांपासून बचावकार्य सुरू होते. ऑगर मशिनने या मजुरांना बाहेर काढण्यासाठी खोदकाम करण्यात आले. अखेर १७ व्या दिवशी हे खोदकाम पुर्ण झाले अन् मजुरांना बाहेर काढण्यात आले.
मात्र गेल्या १७ दिवसांपासून हे मजुर या बंद बोगद्यात अडकले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करता सर्वप्रथम त्यांना रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यासाठी सिलक्यारा बोगद्याजवळ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. एनडीएआरएफचे जवान हे सिलक्यारा बोगद्यात दाखल झाले असून यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिहं धामी देखील तिथं दाखल झाले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा योजनेअंतर्गत या बोगद्याचे काम सुरू होते. उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर बोगद्याचं काम सुरु आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वातावरणात रस्ते वाहतूक करता येणार आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु आहे. हा बोगदा 4.5 किमी लांब आहे. ज्यामध्ये १२ नोव्हेंबरला हे सर्व कामगार अडकले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.