Raj Thackeray News: बाळासाहेबांचा कसला विचार पुढे नेत आहात? मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा CM शिंदेंवर निशाणा

Raj Thackeray on Cm Eknath Shinde over marathi patya: बाळासाहेबांचा कसला विचार पुढे नेत आहात? असा सवाल करत मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSaam tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

Raj Thackeray on Cm Eknath Shinde:

सुप्रीम कोर्टाटच्या निर्देशनानुसार दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या दुकानावर मराठी पाट्या नसतील, त्या दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. मात्र, मराठी पाट्यांच्या निकालाची अंमलबजावणी सरकार करताना दिसत नाही, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचा कसला विचार पुढे नेत आहात? असा सवाल करत मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते पाषाण येथील सोमेश्वरवाडीत मनसे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. या उद्घाटनानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी पाट्यांवर राज्य सरकारवर निशाणा साधला.

'मराठी पाट्यांसंदर्भात कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी सरकार करताना दिसत नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार म्हणतात, बाळासाहेबांचा हा कसला विचार पुढे नेत आहात? असा सवाल करत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray News
Uddhav Thackeray News: 'राज्यात अवकाळी पाऊस आणि मुख्यमंत्री तेलंगणात..' उद्धव ठाकरे जोरदार बरसले!

'कोर्टाच्या आदेशाचा, पोलिसांचा, शासनाचा काही धाक राहिला आहे की नाही. कोणाचाच धाक राहिला नसेल तर आपली वाटचाल कुठे सुरू आहे? आपण अराजकाच्या दिशेने चाललो आहोत, असंही म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'पुण्यातच नाही तर देशभर ड्रग्जचे जाळे पसरले आहे. माझा पोलिसांवर एवढा विश्वास आहे की, पोलिसांना २४ तासांचा वेळ द्या. ते सर्व वठणीवर आणतील. पण यांना करायचंच नाही. त्यामुळं सगळीकडे ड्रग्जचाच पैसा आहे की काय, असं वाटायला लागतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray News
Unseasonal Rain Crisis: 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे...' कृषीमंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मात्र, यावेळी राज ठाकरेंनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलण्यास राज ठाकरे यांनी टाळलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com