Unseasonal Rain Crisis: 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे...' कृषीमंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. सोमवारी (२७, नोव्हेंबर) रात्री राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाने बीड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam tv
Published On

Dhananjay Munde News:

अवकाळी पावसाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. सोमवारी (२७, नोव्हेंबर) रात्री राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाने बीड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. असं ट्विट करत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे..

काय म्हणाले धनंजय मुंडे?

"राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे. तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले असल्याची," माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

तसेच "कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे," असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हणले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhananjay Munde
MNS Protest For Marathi Patya: मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना फासले काळे, अलिबाग, नवी मुंबईत मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

अवकाळी पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान...

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. मराठवाड्यात अवघ्या चोवीस तासात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. (Latest Marathi News)

Dhananjay Munde
Pune Crime News: पुण्यात कुत्र्यावर एयरगनच्या छराने हल्ला; घटनेमागचं कारण ऐकून तुमचाही होईल संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com