उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता धीरज बिष्ट याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांनी अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली.
नैनितालचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंजुनाथ टी.सी. सांगितले की, हल्द्वानी येथील एका हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी मुख्य आरोपी धीरज बिष्ट याच्यासह ४ आरोपींना अटक केली. इतर ३ आरोपींची ओळख नितीन पाल, अंश खत्री आणि हिमांशू बोनी अशी पटली आहे. धीरज बिष्टने अलीकडेच हल्द्वानी येथील एमबीपीजी कॉलेजमध्ये एबीव्हीपीचे प्रतिनिधित्व करत विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली होती.
पीडितेच्या कुटुंबीयांनी मुखानी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ४ आरोपींनी अल्पवयीन मुलीला फूस लावून मुखानी एका हॉटेलमध्ये नेले. जिथे त्यांनी तिला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर उघडकीस आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. आम्ही तात्काळ एसएचओंना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले जो आता कायद्याच्या संबंधित कलमांनुसार दाखल करण्यात आला आहे.'
पोलिसांनी पुढे सांगितले की, ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. हॉटेलच्या परिसराची पाहणी आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी यासह प्राथमिक तपासातून आरोपींनी हे कृत्य केल्याचे उघड झाले. आरोपींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलिस पुरावे गोळा करत आहेत. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.' या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.