Crime  Saam TV
देश विदेश

Shocking Crime: पती की हैवान? कोल्ड ड्रिंकमधून नशेचं औषध, नंतर बायकोच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...; शहराला हादरवणारी घटना

Wife Assaulted by Husband in Dehradun: उत्तराखंडच्या देहरादून शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या गुप्तांगाला दुखापत केली आहे.

Bhagyashree Kamble

एक धक्कादायक घटना उत्तराखंडच्या देहरादूनमधून समोर येत आहे. आधी नवऱ्याने कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून कुटुंबाला प्यायले दिले. नंतर बायकोला दिले आणि तिच्या गुप्तंगाला दुखापत केली. पतीच्या क्रूरतेमुळे पीडित पत्नीच्या आतड्यांमध्येही खोल जखमा झाल्या आहेत. सध्या आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं घडलं काय?

पत्नीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आधी आरोपीने सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक आणली. नंतर सर्वांना प्यायली दिली. कुटुंबातील सदस्यांनी कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर त्यांना नशा चढली. त्यात अंमली पदार्थ मिसळल्यामुळे त्यांना नशा चढली. त्यावेळी मात्र, आरोपी कोल्ड्रिंक प्यायला नाही.

कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर घरातील सदस्य बेशुद्ध झाले. घरातील सदस्य झोपले. नंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत दुष्कृत्य केले. तसेच पीडितेच्या गुप्तांगाला दुखापत केली. शस्त्राने पीडित महिलेच्या गुप्तांगाला दुखापत केल्यामुळे आतड्यांनाही खोलवर जखमा झाल्या. जेव्हा कुटुंबाला जाग आली, तेव्हा पीडित महिला वेदनेने विव्हळत होती.

दुसऱ्या दिवशी आरोपी कामावर गेला. पण त्याने पीडितेला दवाखान्यात नेले नाही. नंतर कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या लोकांनी पीडित महिलेला दवाखान्यात नेले. पीडितेच्या बहिणीने नंतर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितले की महिलेच्या गुप्तांगापासून आतड्यांपर्यंत खोलवर जखमा झाल्या आहेत. त्या महिलेवर शस्त्रक्रिया केली जाईल. निरीक्षक हरिओम राज चौहान म्हणाले की, पीडित महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT