Patanjali 14 Products Ban in Uttarakhand  Saam TV
देश विदेश

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Patanjali Products Ban: दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

Satish Daud

Patanjali 14 Products Ban in Uttarakhand

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या तब्बल १४ औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे.

उत्तराखंड सरकारने सोमवारी (ता. २९) संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. त्यात असं म्हटलंय की, "पतंजली आयुर्वेदाच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे आम्ही कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे."

बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

या १४ औषधांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत. इतकंच नाही, तर या औषधांचा परवाना देखील सरकारने रद्द केला आहे. तसा आदेशही सर्व जिल्हा औषध निरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.

पतंजलीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

नुकतंच सुप्रीम कोर्टाने देखील पंतजलीचे मालक बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना फटकारलं होतं. पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातील केल्या जात असल्याचं सांगत कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी तातडीने माफी मागा असे आदेशही कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर पतंजलीने दोन वेळा वृत्तपत्रांमध्ये माफीनाम्याची जाहीरात दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

SCROLL FOR NEXT