Baba Ramdev: सुप्रीम कोर्टाने फटकारलं, बाबा रामदेव यांनी पुन्हा मागितली माफी; जाहिरातीत काय म्हटलं?

Baba Ramdev Apology News: पतंजलीने 'बिनशर्त सार्वजनिक माफी' या नावाने बुधवारी (ता. २४) वृत्तपत्रांमध्ये मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
Ramdev Baba
Ramdev BabaSaam Tv

Baba Ramdev Apology Supreme Court

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर योगगुरू रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने पुन्हा एकदा वृत्तपत्रातून जाहीर माफी मागितली आहे. पतंजलीने 'बिनशर्त सार्वजनिक माफी' या नावाने बुधवारी (ता. २४) वृत्तपत्रांमध्ये मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

Ramdev Baba
Baba Ramdev News: पतंजलीने मागितली 67 वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आम्ही पुन्हा माफीनामा प्रसिद्ध करीत आहोत. आमच्याकडून अशा त्रुटी राहणार नाही आणि यापुढे चुकाही होणार नाही, अशी ग्वाही पतंजलीने दिली आहे. आम्ही माननीय न्यायालयाच्या सूचनांचे अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत निष्ठेने पालन करण्यास वचनबद्ध आहोत, असं पतंजलीने आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.

पतंजलीने कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथी विरोधात नकारात्मक प्रचार केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. याचिकेवर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने पतंजलीला चांगलंच फटकारलं.

दिशाभूल केलेल्या जाहिरातीप्रकरणी जाहीर माफी मागा, असे निर्देश कोर्टाने योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीला दिले. त्यानुसार, पतंजली आयुर्वेदकडून मंगळवारी (ता. २३) वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, यावरुन कोर्टाने पुन्हा पतंजलीला फटकारलं.

हा माफीनामा अत्यंत लहान आकाराचा आहे. फक्त माफीनामा प्रसिद्ध करू नका, जाहिरातीवढ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध करा. तसेच जाहिरातीसाठी जेवढा खर्च केला, तेवढाच माफीनाम्यासाठी केला का, असे सवाल न्यायालयाने केले होते.

न्यायालयाने फटकारल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करत आम्ही पुन्हा एकदा माफीनामा प्रसिद्ध करत आहोत, असे पतंजलीने स्पष्ट केले आहे. आमच्याकडून अशा त्रुटी राहणार नाही आणि चुकाही होणार नाही, असेही त्यात म्हटले आहे.

Ramdev Baba
CM Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात CM केजरीवालांना पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन, रक्तातील साखरेची पातळी किती झाली? वाचा अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com