Dinesh Agarwal Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election: काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांनी सोडला पक्ष

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024 :

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच ऐन लोकसभा निवडणुकीत अनेक नेते हे आपला पक्ष सोडून इतर पक्षात उडी घेताना दिसत आहेत. यातच राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर उत्तराखंडमध्येही पक्षाला धक्का बसला आहे. उत्तराखंडमधील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिनेश अग्रवाल यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडमधील माजी मंत्री दिनेश अग्रवाल हे अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते, असं बोललं जात आहे. शनिवारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात काँग्रेसमधील नेत्यांना यश आलं नाही. यानंतर दिनेश अग्रवाल यांनी रात्री उशिरा काँग्रेसचा राजीनामा दिला.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिनेश अग्रवाल यांचे राजीनामापत्र समोर आले आहे. त्यांनी आपला राजीनामा उत्तराखंड काँग्रेस कमिटीकडे पाठवला आहे. दिनेश अग्रवाल यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, ''सर, मी तुम्हाला कळवू इच्छितो की, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.'' (Latest Marathi News)

दरम्यान, दिनेश अग्रवाल तीन वेळा धरमपूरमधून आमदार राहिले आहेत. काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्रीही होते. दिनेश अग्रवाल यांनी पक्ष सोडल्यामुळे हरिद्वार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. हरिद्वार लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा धरमपूर हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT