Uttarakhand Crime Saam TV
देश विदेश

Uttarakhand Crime: उत्तराखंड दंगलीमध्ये ५० पोलीस जखमी; दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घाला, सरकारचे आदेश

Uttarakhand News: जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात झालेल्या या दंगलीत ५० हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Uttarakhand Crime:

उत्तराखंडमध्ये दगडफेकीची मोठी घटना घडली आहे. हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात झालेल्या या दंगलीत ५० हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, उत्तराखंड सरकारने सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. बैठकीत धामी यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आणि इंटेलिजन्सच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

धामी यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगल झाल्यानंतर येथील दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घाला, असे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा बांधण्यात आला होता. गुरुवारी (8 फेब्रुवारी) रोजी येथे नमाज पठण सुरू होतं. त्यावेळी महापालिकेचं पथक जेसीबी घेऊन हा मदरसाजवळ पाडकामासाठी दाखल झालं. महापालिकेचं काम सुरू असताना काही समाजकंटकांनी तेथे महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक केली आणि मोठी दंगल उसळली.

अवैध बांधकाम असल्याने मदरसाची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. मदरसा पाडण्यासा विरोध करणाऱ्या व्यक्तींनी याच परिसरात अनधिकृत वसती उभारली आहे. या वसतीवरही कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दंगल झाली त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. मात्र त्यानंतर जमाव जास्तच आक्रमक झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT