Rescue teams conduct a challenging operation after a vehicle plunged into a deep gorge and caught fire in Uttarakhand’s Champawat district. saam tv
देश विदेश

भीषण अपघात! 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागली; 5 जणांचा मृत्यू

Uttarakhand Gorge Accident 5 Dead Vehicle Fire: उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील बाराकोट परिसरात बापुरू-बतोली रस्त्याजवळ बाराकोट परिसरात बापरू-बतोली रस्त्याजवळ एक भीषण अपघात घडला. सुमारे 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून त्याला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

SDRF ने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा नियंत्रण कक्षाकडून या अपघाताची माहिती मिळताच चंपावत येथील SDRF पथक तातडीने रवाना झाले. उपनिरीक्षक डुंगर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचले असता वाहन खोल दरीत कोसळून जळत असल्याचे आढळले. SDRF आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य सुरू केले. वाहनात एकूण पाच जण प्रवास करत होते. बचाव पथकाने नीतू देवी (31), अक्षिता (8) आणि आरव (5) यांना सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात वाहन चालक राजेंद्र कुमार (47, रा, अजेंडा,) आणि बलदेव कुमार (34, रा. ननकोडी, अजेंडा) यांचा मृत्यू झाला. पथकाने मृतदेह ताब्यात घेतले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान यापूर्वी 10 जून रोजीही मुसुरी रोडवरील झरीपाणी परिसरात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यामध्ये कार खोल दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी देखील पोलीस, अग्निशमन दल आणि SDRF यांनी संयुक्तरित्या बचावकार्य राबवले होते. अत्यंत कठीण अशा परिस्थितीत आणि उंच डोंगरांच्या भागात बचावकार्य करणे मोठे आव्हान ठरत असल्याचे SDRF ने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी टोलजप्ती, जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Saam Investigation: कृषी खात्यानं दिलेलं बियाणं बोगस, सरकारकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक?

पवार शिंदे-भेट, ठाकरेसेना दुखावली, शिंदेंच्या दालनात पवारांच्या आमदारांची बैठक

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; डेक्कन क्वीनसह २२ गाड्या आठवडाभरासाठी रद्द, संपूर्ण यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT