Uttarakhand Jeep Accident Saam Tv
देश विदेश

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Jeep Accident: उत्तराखंडमध्ये भाविकांवर काळाने घाला घातला. प्रवाशांनी खचाखच भरलेली जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले.

Priya More

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उत्तराखंडमधील पिथोरागड येथे भाविकांना घेऊन जाणारी जीप १५० फूट खोल दरीत कोसळली. मुवानी शहरातून बोक्ताकडे ही जीप जात होती. ही जीप पुलावरून थेट दरीत कोसळून नदीमध्ये पडली. या अपघातामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या पिथोरागडमधील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५२ किमी अंतरावर जीपला अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जीपमधून १३ जण प्रवास करत होते. जीप पुलावरून दरीत कोसळत नदीत पडली. यावेळी जीपमध्ये असलेल्या प्रवाशांनी जोरात आरडाओरडा केला. या अपघातामध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये ३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

जखमींना नदीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले आणि नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. सर्व मृत बोक्ता येथील असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर बोक्ता गावावर शोककळा पसरली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

Pune Bhide bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

Heart Health: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक आहे?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन; योग्य मोबदला मिळण्यासाठी आक्रमक

Pune : डिलिव्हरी बॉय बनून यायचा अन् वाहनांची चोरी करायचा, चोराला पुणे पोलिसांनी अद्दल घडवली

SCROLL FOR NEXT