Uttar pradesh Wife arranged husband and girlfriend marriage guna District viral love story Saam TV
देश विदेश

Viral News: ऐकावं ते नवलंच! बायकोनेच गर्लफ्रेंडसोबत लावलं नवऱ्याचं लग्न; आता तिघेही नांदतात सुखाने

Viral Marathi News: पत्नीने आपल्या पतीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर संमतीने पतीचं प्रेयसीसोबत लग्न लावून दिलं

Satish Daud

Uttar Pradesh Marriage Viral News: एका विवाहित तरुणाचं १८ वर्षीय युवतीवर प्रेम जडलं. दोघेही लपून लपून एकमेकांना भेटत होते. दोघांनाही लग्न करायचं होतं. मात्र, खरा ट्विट तेव्हा आला जेव्हा या तरुणाच्या पत्नीला त्याच्या प्रेमकहाणीची कुणकुण लागली. तिने आपल्या पतीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर संमतीने पतीचं प्रेयसीसोबत लग्न लावून दिलं.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं हे प्रकरण मध्यप्रदेशातील गुन्हा जिल्ह्यातून समोर आलं आहे. बायकोनेच आपल्या नवऱ्याचं लग्न त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लावून दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सध्या गुना जिल्ह्यात या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुना जिल्ह्यातील (Uttar Pradesh) बजरंगगड येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यासोबत तिचे नातेवाईक देखील होते ६ एप्रिलला ही तरुणी अचानक रुग्णालयातून गायब झाली. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र, ती कुठेच मिळून आली नाही.

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार या तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत दिली. तिचे कॉल डिटेल्स तपासून रुग्णालयातील पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तरुणीचा शोध घेतला असता, ती एका महिलेसोबत पळून जाताना दिसली. (Breaking Marathi News)

दरम्यान, पोलिसांना ही महिला आणि बेपत्ता असल्याची तरुणी अशोकनगर जिल्ह्यातील शाढोरा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांची टीम त्याठिकाणी पोहचली आणि युवतीला कोतवाली पोलीस (Police) स्टेशनला आणले.

पोलिसांसमोर तरुणीने आपण पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न (Marriage) केलं असल्याची कबुली दिली. माझे खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं प्रेयसीने म्हटलं. विशेष म्हणजे प्रियकराचे याआधीच लग्न झाले होते. मुलगी अल्पवयीन नसल्याने पोलिसांनीही तिच्यावर दबाव टाकला नाही. ती सज्ञान असल्याने तिचा निर्णय घेऊ शकते असं पोलीस म्हणाले.

विशेष बाब म्हणजे तरुणीच्या प्रियकराचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याच्या पत्नीच्या संमतीनेच तिने तरुणासोबत लग्न केलं. लग्नावेळी स्वत: पत्नीही तिथे हजर होती. रिपोर्टनुसार, युवकाला पहिल्या पत्नीपासून कोणतेही मूल नाही. आता प्रेयसीसोबत लग्न केल्याने पती, पत्नी आणि प्रेयसी असे तिघेजण एकत्रित आनंदाने संसार करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT