लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसी उमा हिची निर्घृण हत्या केली.
कारमध्ये गळा दाबून हत्या केल्यानंतर शिरच्छेद केला.
मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचे तपासात उघड झाले.
आरोपीला त्याच्याच लग्नाच्या दिवशी पोलिसांनी अटक केली.
Live-in partner murder case in Uttar Pradesh : प्रेमात मिळालेला धोका, बेवफाई अन् क्रूरतेची एक भयानक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील उमा हिची तिच्याच लिव्ह-इन पार्टनर बिलाल याने निर्घृण हत्या केली. त्यावरच नराधम थांबला नाही, त्याने तिचे शिरच्छेदही केला. बिलाल याने गर्लफ्रेंड उमा हिला कारमध्ये शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिने कपडे काढल्यानंतर गळा दाबून हत्या केली. त्यानंतर धड अन् शीर वेगळे केले अन् मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी आरोपी बिलालला तिच्या लग्नाच्या दिवशीच अटक केली.
बिलाल हा टॅक्सी चालक आहे. मागील दोन वर्षांपासून बिलाल आणि उमा लिव्ह इनमध्ये राहत होते. बिलाल याचे लग्न ठरले होते, त्यामुळे त्याला उमापासून सुटका हवी होती. पण उमा आपल्यासोबत लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे बिलाल याने प्रेमाच्या आडून रक्तरंजित प्लान आखला. ६ डिसेंबर रोजी बिलाल उमाला कारमध्ये घेऊन बाहेर गेला. पाच ते सहा तास ते बाहेरच फिरले. त्यानंतर ते हरियाणा-हिमाचल सीमेवरील पांठा साहिबजवळ पोहोचले.
बिलालने कारमध्ये प्रेमसंबंधाची इच्छा व्यक्त केली. उमाने होकार दिला अन् कपडे काढले. त्यानंतर बिलाल याने उमा हिचा बेल्टने गळा दाबून खून केला. हत्येनंतर बिलालने उमाचा शिरच्छेद केला. त्याने नग्न धड प्रतापनगर जंगलात फेकून दिले आणि ओळख पटू नये म्हणून डोके दुसरीकडे फेकले.
उमाचे आयुष्य सुरुवातीपासूनच एखाद्या चित्रपटासारखा राहिलाय. तिचे लग्न ठरले, बोहल्यावर चढणार होती. पण लग्नाच्या रात्री प्रियकर जॉलीसोबत पळून जाऊन लग्न केले. तिच्या वडिलांनी १५ वर्षांपूर्वी शेवटचे तिला पाहिले होते. जॉलीसाठी तिने कुटुंबाला सोडले होते. पण लग्नानंतर १३ वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिचे सूत बिलालसोबत जुळले होते. पण बिलाल याने तिचा जीव घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.