Uttar Pradesh: धक्कादायक! माकडांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, घटनेने सारे गाव हादरले Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh: धक्कादायक! माकडांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, घटनेने सारे गाव हादरले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथील बिथरी चेनपूर (Chenpur) पोलीस (Police) स्टेशन हद्दीत बिचपुई गावामध्ये माकडांच्या (Monkey) कळपाने ५ वर्षांच्या मुलीचा बळी घेतला आहे. नरकटिया नदीजवळ (Narkatiya river) नर्मदा नावाची मुलगी तिच्या मैत्रिणींबरोबर (friends) खेळत असताना माकडांनी (Monkey) मुलांवर हल्ला (Attack) केला आहे. मदतीकरिता आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक (People) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नर्मदा आणि इतरांची सुटका केली आहे. मात्र तोपर्यंत नर्मदेला माकडांनी चावा घेतला आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने सामुदायिक आरोग्य केंद्रात (Health Center) तिचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

३ भावंडांमध्ये नर्मदा सर्वात लहान होती. तिचे वडील नंद किशोर हे रोजंदारी मजूर आहेत. ते सांगितले आहे की, लहान मुलांवर माकडांनी हल्ला केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, परंतु या प्रकरणामध्ये माकडे अत्यंत आक्रमक होते आणि त्यांनी माझ्या मुलीला जवळपास सर्वत्र चावा घेतला होता. मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा माझी मुलगी रडत होती.

बिथरी चेनपूर पोलिस (Police) स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कुटुंबाला नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे. या माकडांचा नायनाट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आम्ही त्यांना वनविभागाची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणात एफआयआर शक्य नाही. बरेलीमध्ये माकडांनी लोकांना जखमी केल्याची खूपच प्रकरणे समोर आली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT