अजब लग्नाची गजब कहाणी! Pakistan खासदाराने घटस्फोटादिवशीच केलं तिसरं लग्न
अजब लग्नाची गजब कहाणी! Pakistan खासदाराने घटस्फोटादिवशीच केलं तिसरं लग्नSaam Tv

अजब लग्नाची गजब कहाणी! पाकिस्तानच्या खासदाराने घटस्फोटादिवशीच केलं तिसरं लग्न

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे पीटीआयचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी १८ वर्षांच्या मुलीबरोबर तिसरे लग्न केले
Published on

वृत्तसंस्था: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे पीटीआयचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन (Dr. Aamir Liaquat Hussain) यांनी १८ वर्षांच्या मुलीबरोबर तिसरे लग्न केले आहे. ४९ वर्षीय हुसैन यांनी बुधवारी १८ वर्षीय सईदा दानिया (Saida Dania Shah) शाहबरोबर लग्न केले आहे. खासदाराच्या (MP) या लग्नाची शेजारच्या राष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी आमिरचे लग्न (married) झाले आहे, त्या दिवशी पाकिस्तानी (Pakistan) खासदाराने आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला होता. डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या नव्या पत्नीविषयी लिहिले आहे. (pakistan imran khan pti party mp aamir liaquat hussain announces third marriage with saida dania shah)

हे देखील पहा-

काल रात्री १८ वर्षांच्या सईदा दानिया शाहाबरोबर माझे लग्न झाले आहे. पाकिस्तानच्या या खासदाराने तिसऱ्या पत्नीचे खूप तोंडभरुन कौतुक केले आहे. 'सईदा खूप गोड, सुंदर, साधी आणि प्रिय आहे. मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी आमच्याकरिता प्रार्थना करावी. आयुष्यात वाईट काळ मी मागं सोडल आहे. तो चुकीचा निर्णय होता, असे हुसैन यांनी आपल्या पोस्टमध्ये यावेळी सांगितले आहे. खासदाराची दुसरी पत्नी अभिनेत्री तुबा आमिरने (Actress Tuba Aamir) बुधवारी स्पष्ट सांगितले आहे की, तिने हुसैनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजब लग्नाची गजब कहाणी! Pakistan खासदाराने घटस्फोटादिवशीच केलं तिसरं लग्न
Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू

इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर करत तुबाने खुलासा केला आहे की, आम्ही दोघे १४ महिन्याअगोदरच वेगळ झालो आहोत. आता आमच्यामध्ये समेट होण्याची कोणतीही आशा नाही. त्यामुळे मी न्यायालयामध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो सर्व काही माझं ठिक करेल, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com