Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये पानिपत-खतिमा महामार्गावर भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारने टेम्पोला धडक दिली. या अपघातामध्ये चार जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला

  • पानिपत-खतिमा महामार्गावर ही घटना घडली

  • भरधाव कारने टेम्पोला दिली जोरदार धडक

  • चार जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

  • पोलिसांकडून तपास सुरू

उत्तर प्रदेशमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील चार जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. पानिपत-खतिमा महामार्गावर बुत्राडा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पानिपत खातिमा महामार्गावर बुत्राडा गावाजवळ अपघाताची ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये असणाऱ्या चारही मित्रांनी जागीच प्राण सोडले. कारला करटच्या सहाय्याने कापून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांकडून सध्या पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. हे चारही तरुण हरियाणाचे रहिवासी होते. पोलिस त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चारही तरुण हरिद्वारला जाण्यासाठी निघाले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टीम इंडियाचा टी-20 संघाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

SCROLL FOR NEXT