Uttar Pradesh Latest News Saam TV
देश विदेश

राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Uttar Pradesh Latest News : उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या घडामोडी! राकेश प्रताप सिंह, अभय सिंह आणि विनोद चतुर्वेदी हे समाजवादी पक्षाचे तीन आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Rakesh Pratap Singh BJP joining news : उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच विरोधक समाजवादी पक्षाला (सपा) जोरदार धक्का बसला आहे. आमदार राकेश प्रताप सिंह यांच्यासह तीन आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. या राजकीय घडामोडीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या पक्षप्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. (Rakesh Pratap Singh BJP joining)

समाजवादी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह हे आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत गोसाईगंजचे आमदार अभय सिंह आणि कालपीचे आमदार विनोद चतुर्वेदी हेदेखील ‘कमळ’ हाती घेणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, मागासवर्गीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरपाल मौर्य आणि मंत्री दारा सिंह चौहान यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

सपाच्या तिकिटावर सलग तीन वेळा निवडून आलेले राकेश प्रताप सिंह हे गेल्या तीन वर्षांपासून पक्षापासून दुरावले होते. सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस आणि इतर धार्मिक मुद्द्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना राकेश सिंह यांनी उघडपणे विरोध केला होता. एका धार्मिक मंचावरून त्यांनी याविरोधात आवाज उठवला, ज्यानंतर सपा नेतृत्वाशी त्यांचे मतभेद अधिकच वाढले होते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांची भूमिका बाजूला ठेवून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी थेट प्रचार केला होता. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, या तीन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात विरोधी पक्षांना मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेले गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भाजपमध्ये जाण्यामागचे कारण सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, मी राष्ट्र आणि रामाच्या भल्यासाठी भारतीय जनता पक्षात सामील होत आहे. यापूर्वी राकेश प्रताप सिंह यांनी गौरीगंजपासून थेट अयोध्येतील राम मंदिरापर्यंत एका भव्य पायी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. याच सर्व घडामोडींदरम्यान, समाजवादी पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत त्यांना आधीच पक्षातून बाहेर काढाले होते.

समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांचा राजीनामा

समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक सभेचे राष्ट्रीय सचिव आणि अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज भागातील नरौलीचे रहिवासी मोहम्मद अमीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अल्पसंख्याक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवून आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट? महापालिकेने मागितले ८ टीएमसी पाणी

Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

Weather : दिल्लीसह १५ राज्यांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात काय स्थिती? हवामान खात्याचा मोठा इशारा

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

SCROLL FOR NEXT