Samajwadi Party leader Akhilesh Yadav challenges UP Deputy CMs to bring 100 MLAs and claim the Chief Minister’s post. saam tv
देश विदेश

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

UP Politics: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीय. १०० आमदार आणा आणि सीएमची खुर्ची घ्या, अशी ऑफर त्यांनी दिलीय.

Bharat Jadhav

  • अखिलेश यादव यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.

  • १०० आमदार आणण्याचे आव्हान देत राजकीय चर्चांना उधाण.

  • उत्तर प्रदेशातील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता.

देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश राज्य अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा या राज्यातील आहेत, त्यामुळे केंद्रातील सत्ता हवी असेल तेथे सत्ता हवी,तर तो पक्ष दिल्लीपर्यंत पोहोचतो. त्याच राज्यात आता मोठी उलथपालथ होण्याची शक्यता आहे. येथील दोन्ही उपमु्ख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर दिलीय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. "दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाने १०० आमदार आणावेत आणि मुख्यमंत्री व्हावं." दरम्यान अखिलेश यांनी शंकराचार्य मुद्द्यावरूनही उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार शंकराचार्यांशी ज्या पद्धतीने वागवत आहे त्याचे उत्तर जनता देईल.

अखिलेश यादव यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना याआधीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आता परत त्यांनी मौर्य यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलीय. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही १०० आमदार आणा आणि मुख्यमंत्री पद घ्या, अशी ऑफर कोणीच देणार नाही, असं अखिलेश यादव म्हणालेत. अखिलेश यादव यांनी यापूर्वीही अनेकदा केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पण यावेळी त्यांनी त्यांचे दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. यावर केशव आणि ब्रजेश पाठक काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे मनोरंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT