यूपीमध्ये २०४७ च्या विकासावर चर्चा करण्यासाठी २४ तासांचं अधिवेशन झालं.
समाजवादी पक्षाच्या महिला आमदार पूजा पाल यांनी सीएम योगीचं कौतुक केलं.
त्यांच्या वक्तव्यावरून समाजवादी पक्षानं त्यांना पक्षातून काढलं.
या घटनेमुळे अधिवेशनापेक्षा राजकीय वाद जास्त चर्चेत आला
उत्तर प्रदेशचे सभागृहात २०४७ मध्ये उत्तर प्रदेश कसा असावा? या भागात विकास कसा असावा? या सर्व विषयांवर सुमारे २४ तासांचे नॉनस्टॉप सत्र आयोजित करण्यात आले होतं. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आपले विचार मांडले. या अधिवेशनादरम्यान, समाजवादी पक्षाच्या महिला आमदार पूजा पाल यांनीही आपले विचार मांडले. मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केलं. मात्र मुख्यमंत्री योगीची प्रशंसा त्यांना महागात पडलंय. कारण अखिलेश यादव यांनी त्यांची पक्षातून हाकलपट्टी केलीय.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षाविरोधात विधान करत होत्या. तसेच बंडखोरीचे विधान त्या करत होत्या. अनेक वेळा त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो शेअर केले होते. हे सर्व केल्यानंतरही पक्षाने त्यांना बडतर्फ केलं नव्हतं. परंतु जेव्हा विधानसभेत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं त्यानंतर पक्षश्रेष्ठींना ते आवडले नाही. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
पक्षातून हकालपट्टी करताना अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली होती. पूजा पाल यांनी आधी भाजपकडून आपलं तिकीट मिळेल यांची खात्री करावी. त्यानंतर त्यांनी पूजा पाल यांना घराचा रस्ता दाखवला. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर टीका करताना म्हटले की, पूजा पाल स्वतःसाठी तसेच मुख्यमंत्री योगींसाठीही तिकिटे मिळवत आहेत. कारण मुख्यमंत्री फक्त निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये आहेत. तर पुजा पाल यांनी आधी भाजपकडून तिकीट घेतले असते तर मी तिला का दिले असते.
पूजा पाल यांची बंडखोरी नवीन नाहीये. राज्यसभा निवडणुकीदरम्यान क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या ७ सपा खासदारांमध्ये पूजा पाल यांचाही समावेश होता. अलिकडेच अखिलेश यादव यांनी ३ बंडखोर सपा आमदारांना पक्षातून काढून टाकले. आता आणखी एका आमदार पूजा पाल यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.