Allahabad High Court: Saam Tv
देश विदेश

High Court: बायकोच्या बहिणीसोबत लैंगिक संबंध अनैतिक; पण मुलगी संज्ञान असल्यास बलात्कार म्हणता येणार नाही: हायकोर्ट

Allahabad High Court: बायकोच्या बहिणीवर म्हणजे मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला हायकोर्टाने जामीन दिला. सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? घ्या जाणून...

Priya More

बायकोच्या बहिणीवर म्हणजेच मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने आरोपी नवऱ्याला मोठा दिलासा दिला आहे. भावोजी-मेहुणीचे नाते जरी अनैतिक असले तरी ती महिला संज्ञान असेल तर याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे हायकोर्टाचे म्हणणे आहे. मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली होती आणि आता त्याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आरोपी नवऱ्याला दिलासा मिळाला.

न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, अर्जदाराच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, या प्रकरणात आरोपी व्यक्तीवर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, भावोजी आणि मेहुणी यांच्यात अनैतिक संबंध आहेत. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की, कथित पीडित मुलगी संज्ञान आहे आणि तिने CrPC च्या कलम 161 अंतर्गत दिलेल्या निवेदनात आरोप नाकारले आहेत. पण पीडितेने नंतर जबाब CrPC च्या कलम 164 अंतर्गत बदलला आणि फिर्यादीच्या केसला समर्थन दिले. जामिनाला विरोध करणारे AGA हे सत्य नाकारू शकले नाहीत की कथित पीडित मुलगी संज्ञान आहे आणि रेकॉर्डने हे माहिती पडत नाही की तिने सहमती दिली नाही.

सुनावणीदरम्यान, कोर्टाने आरोपीवरील आरोप, दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि कथित पीडितेने सुरुवातीला आरोप नाकारले आणि नंतर तिचे म्हणणे बदलले हे देखील विचारात घेतले. यासोबतच, कोर्टाने हे देखील सांगितले की, तिने अर्जदार आणि एका विवाहित पुरुषाशी संबंध बनवले होते.

अशा स्थितीमध्ये कोर्टाने सांगितले की, हे संबंध अनैतिक आहे. पण कथित पीडित मुलगी संज्ञान असल्याने त्याला बलात्कार मानले जाऊ शकत नाही. कोर्टाने याचा देखील विचार केला की, अर्जदार आणि पीडित यांच्यात अनैतिकसंबंध निर्माण झाले होते. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि त्याला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT