High Court: ड्युटीवर झोपणे चुकीचंच; उच्च न्यायलयाचा कर्मचाऱ्यांना दणका

High Court Descision: ड्युटीवर असताना झोपणे हे गैरवर्तन असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. ड्युटीवर झोपलेल्या एका कर्मचाऱ्याला कामावरुन काढण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायलयाने निर्णय दिला आहे.
High Court
High Court Saam Tv
Published On

कामावर असताना अनेकदा खूप थकवा जाणवतो. ८-९ तासांची शिफ्ट आणि त्यानंतर प्रवास करुन माणूस पूर्णपण दमतो. त्यामुळे कधीकधी कामाच्या ठिकाणी कर्मचारी एखादी डुलकी घेतो. थोडा वेळा पॉवर नॅप घेतो. परंतु ड्युटीवर असताना डुलक्या घेणाऱ्यांना उच्च न्यायल्याने चांगलेच झापले आहे.

ड्युटीवर झोप काढणे हे गैरवर्तनच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने केला आहे.ड्युटीवर झोप काढल्याने कामावरुन एका कर्मचाऱ्याला काढून टाकले होते. या कामगाराला थकीत देयकासह पुन्हा कामावर घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. तो आदेश आता उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. (High Court Descision On Sleeping On Duty)

High Court
Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी येणार, तारीख काय?

कामावर झोप काढणाऱ्या कर्मचाऱ्याला शिक्षा देताना त्या कर्मचाऱ्याच्या सर्व्हिसचा मागचा रेकॉर्ड लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आरोपाला पुष्टी देणारे काही पुरावे असतील तर कामगार आणि औद्योगिक न्यायालय कंपनीने केलेल्या चौकशीतील निष्कर्ष रद्द करु शकत नाही, असे निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहेत.

ड्युटीवर असताना झोपलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याचा आणि थकीत वेतन देण्याचा निर्णय रद्द केला आहे.याबदल्यात कर्मचाऱ्याला २२ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

High Court
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

नेमकं काय घडलं होतं?

'असाही'कंपनीत वाकेड प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी नदीम डोलारे याने ही याचिका दाखल केली होती. २००६ रोजी नाइट शिफ्ट करताना तो चेंजिंग रुममध्ये झोपला होता. याप्रकरणी नदीमला ३१ ऑगस्ट २००७ रोजी कामावरुन काढले होते. या बडतर्फीच्या आदेशाला नदीम यांनी आव्हान दिले होते. त्यावर कामागार न्यायालयाने शिस्तभंग आणि संबंधित चौकशीतील निष्कर्ष चुकीचे ठरवले आहेत.

High Court
PPF Scheme: ५०,००० गुंतवा अन् १६ लाख रुपये मिळवा, पोस्टाची भन्नाट योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com