High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Nagpur News: नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. वर्धा जिल्ह्यातील एका प्रकरणामध्ये त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शाररिकसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Saam Tv
Published On

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. एखाद्या १८ वर्षांपेक्षा लहान म्हणजेच अल्पवयीन मुलींशी लग्न करून तिच्याशी शाररिक संबंध ठेवणं हा बलात्कारच असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. वर्धा जिल्ह्यातील एका प्रकरणामध्ये त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खडपीठाने वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम येथील एका प्रकरणात महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम करावास आणि ३५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. याविरोधात नागपूर खडपीठात अपील करत पत्नी आहे असे मांडण्यात आले होते. अल्पवयीन असताना विवाहित असो वा नसो शरिरसंबंध ठेवणं हा कायद्याने गुन्हाच असल्याचा निर्वाळा खंडपीठाने दिला.

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शाररिकसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Accident : काँग्रेसचे नितीन राऊत थोडक्यात बचावले, अज्ञात ट्रकने दिली वाहनाला धडक

वर्ध्यातील या प्रकरणामध्ये आरोपीने स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित मुलगी जिचे वय १८ वर्षांखाली आहे ती आपली पत्नी असल्याचे सांगितले आणि तिच्यासोबत शारीरसंबंध तिच्या सहमतीने ठेवले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवता येणार नाही, असा दावा नागपूर खंडपीठाने केला आहे. कोर्टाने या प्रकरणात असे सांगितले की, १८ वर्षांखालील वयाची मुलगी विवाहित असो किंवा नसो तिच्यासोबत शारीरसंबध ठेवणे हा बलात्कारच आहे. त्याचसोबत त्या मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेल्या सहमतीला देखील कायद्यात कागीच अर्थ नाही, असे देखील कोर्टाने स्पष्टपणे सांगितले.

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शाररिकसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Nagpur News : नागपूर मविआमध्ये बिघाडी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांचा प्रचार

वैभव गजानन टेकाम (२४ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे हा आरोपी राहतो. आरोपीने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तिला फसवले. आरोपी तिच्याकडे सतत शरीरसुखाची मागणी करत होता. पीडित मुलगी नकार देत होती. एक दिवस आरोपीने नागपूर रोडवरील फार्म हाऊसवर तिच्यावर शरीरसंबंध ठेवले आणि त्यातून मुलगी गरोदर राहिली.

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शाररिकसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Nagpur News : नदी काठावर सापडले ८०० आधारकार्ड; नागपूर जिल्ह्यातील प्रकार, पोलिसांनी केले जप्त

आरोपीने मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या गळ्यात हार घालून लग्न केल्याचा बनाव केला. त्यानंतर काही दिवसांनी तो तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकू लागला. पण पीडित मुलीने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिला मारहाण करत होता. शेवटी पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला कोर्टाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ३,५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शाररिकसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Nagpur News: 'विधवा सूनही सासरची मुलगीच'; कोर्टाचे महत्वाचे निर्देश, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com