Bank Employee Dies Due To Work Pressure Saam Tv
देश विदेश

Bank Employee Dies: वर्क प्रेशरचा आणखी एक बळी, महिला बँक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

Bank Employee Dies Due To Work Pressure: लखनऊमध्ये बँकेत नोकरी करणाऱ्या महिला कर्मचारीचा वर्क प्रेशरमुळे ऑफिसमध्येच दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

पुण्यातील सीए तरुणीचा वर्क प्रेशरमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महिला कर्मचारी वर्क प्रेशरचा बळी ठरली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील ही घटना आहे. ऑफिसमध्येच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने महिला कर्मचारीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जास्त कामाच्या दबावामुळे या महिला कर्मचारीची मृत्यू झाल्याची सांगितले जात आहे.

लखनऊमधील एका खासगी बँकेच्या महिला अधिकारी सदफ फातिमा यांचा ऑफिसमध्येच दुर्दैवी मृत्यू झाला. सदफ फातिमा या लखनऊच्या विभूतीखंड येथील एचडीएफसी बँकेत काम करत होत्या. त्या अ‍ॅडिशनल डेप्युटी वाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होतद्या. सदाफ फातिमा या लखनऊच्या वजीरगंज भागातील रहिवासी होत्या. लंच ब्रेकदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सदफ फातिमा यांच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ती कामाच्या खूप तणावाखाली होता. ४५ वर्षीय सदफ मंगळवारी दुपारी ऑफिसमध्ये जेवायला बसली असताना ती बेशुद्ध झाली. ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

सदफ फातिमाच्या मृत्यूवरून आता उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. 'कामाच्या दबावामुळे आणि तणावामुळे कार्यालयात खुर्चीवरून पडून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी खूपच चिंताजनक आहे. अशा बातम्या अर्थव्यवस्थेच्या दबावाचे प्रतीक आहेत.', असे अखिलेश यादव यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

अखिलेश यादव यांनी या पोस्टमध्ये असे देखील लिहिले की, 'व्यवसाय वाचवण्यासाठी ती कमी लोकांच्या कामाच्या अनेक पट काम करत होती. अशा मृत्यूंना भाजप सरकार जितके जबाबदार आहे तितकेच लोकांना मानसिकदृष्ट्या परावृत्त करणाऱ्या भाजप नेत्यांची वक्तव्ये आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी कंपन्या आणि विभागांनी 'तत्काळ सुधारणा'साठी सक्रिय आणि अर्थपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT