Love Saam TV
देश विदेश

Unique Love Story : प्रेम आंधळं असतं, पण इतकं?; तरुणी बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच गेली पळून, वर्षभरानंतर...

Unique Love Story : पोलिसांनी वर्षभरानंतर दोघांनाही दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

UP Viral News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक अजब प्रेमाची घटना समोर आली आहे. एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबत पळून गेली आहे. याप्रकरणी तरुणीच्या घरच्यांनी अपहरणाची पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोधून काढलं. वर्षभरानंतर दोघांनाही दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणी सज्ञान असल्याने तिच्या जबानीच्या आधारेच कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैया येथील कानपूरच्या चकेरी भागात कामाच्या शोधात आला होता. कमलेश याचा मुलगा गवंडी काम काम करायचा. दरम्यान, त्याचे तेथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. (Latest News Update)

तरुणी जवळच राहत असल्याने कधी-कधी ती तरुणाला भेटण्यासाठी त्याच्या घरीही येत असे. मात्र ज्यावेळी तिचा बॉयफ्रेंड घरी नसायचा त्यावेळी त्याचे वडील कमलेशशी गप्पा मारायची. या दरम्यान त्यांची घट्ट मैत्री झाली.

त्यांच्यातील संवाद जसा वाढला तसे मुलीचे तिच्या बॉयफ्रेंडच्या वडिलांवर जीव जडला. मात्र आपले वडील आणि प्रेयसी यांच्यात काय सुरु आहे याची काहीही कल्पना मुलाला नव्हती. मार्च २०२२ ही तरुणी कमलेशसोबत पळून गेली. कमलेशचा मुलगा घरीच होता, त्यामुळे मुलीच्या घरच्यांना त्याच्यावर संशय आला नाही.

यानंतर मुलीच्या घरच्यांनी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तरुणी कुठे गेली याचा कोणताही सुगावा पोलिसांनाही लागत नव्हता. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला असता कमलेश तरुणीसोबत दिल्लीत राहत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. तेथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहातून बाहेर

Gold Price: आठवडाभरात सोनं ८००० रुपयांनी वाढले, २०२४ मध्ये दसऱ्याला सोन्याची दर किती होते?

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

SCROLL FOR NEXT