Raju Shetti News : तहसीलदारच्या बदलीसाठी 25 लाख, तर कलेक्टरसाठी... राजू शेट्टींनी सांगितलं डोळे पांढरे करणारं रेट कार्ड

Raju Shetti News: तलाठ्यासाठी पाच लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी 5 कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.
Raju shetti
Raju shettiSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News : स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. बदल्यासांठी लाखांचे पट्टीत दर निघाले आहेत. तलाठ्यासाठी पाच लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी 5 कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

राज्यात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. सध्या बदल्यांसाठीचे आकडे अचंबित करणारे आहेत. पैसे घेणारा बोलत नाही, पण पैसे देणारे अधिकारी उघडपणे बोलतात. आम्ही एवढे पैसे देऊन इथे आलो आहेत. आम्हाल कोण जाब विचारणार आहे. कारण जाब विचारणाऱ्यांनाच आम्ही पैसे दिले आहेत. असं बोलून अधिकारी सर्रास सर्वसामांन्यांकडून लाच मागतात. अशाप्रकारे प्रशासनाला भ्रष्टाचाराची किड लागली आहे. (Latest Marathi News)

Raju shetti
Ajit Pawar News: 'नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री, अजित पवारच होणार मुख्यमंत्री'; राष्ट्रवादीची बॅनरबाजी चर्चेत

प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरु आहे. याचा त्रास सर्वसामानांना होत आहे. बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या रँकनुसार दर ठरले आहेत. शिक्षण संचालक, अभिंयता, पोलीस अधिकारी यांच्यासाठी एक रेट कार्ड ठरलेले आहेत. बदल्यांच्या अक्षरश: बाजार मांडला जात आहे. मग अशा भ्रष्ट व्यवस्थेविरोधात माझ्यासारख्याने का आवाज उठवू नये, असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केली. (Maharashtra Politics)

मी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. याचं उत्तर मला मिळणार नाही याची मला खात्री आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यभर रान उठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच आरोप खोटे असतील तर मला कोर्टात खेचा, नाहीतर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करा, असं आव्हानही राजू शेट्टीं यांनी सरकारला दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com