Ajit Pawar News: 'नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री, अजित पवारच होणार मुख्यमंत्री'; राष्ट्रवादीची बॅनरबाजी चर्चेत

Ajit Pawar News: अजित पवार राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपमध्ये जाणार अशी चर्चा मागील काही दिवस सुरु होती.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

Nagpur News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि नागपूरात 'अजित पवार भावी मुख्यमंत्री' अशी बॅनरबाजी केली. अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर आता अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. कालच भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारे बॅनर लावले होते.

'वचनाचा पक्का, हुकुमाचा एक्का; मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का', नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री, अजित पवारच होणार मुख्यमंत्री' नागपुरात लागलेले हे बॅनर आज दिवसभर चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आज अजित पवार यांचे बॅनर लावून अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. (Latest News)

Ajit Pawar
Washim Viral News: खेळता खेळता तोल गेला, चिमुकली 30 फूटांच्या उंचीवरुन बाईकवर कोसळली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

तर मुंबईत राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे पोस्टर लावून या पोस्टर्सवर 'दादा मुख्यमंत्री झाले तर?' असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवकांचे अनेक प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त केला. (Political News)

राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता या बॅनरबाजीने चर्चेत रंग आणलाय.

Ajit Pawar
Sharad Pawar On Barsu Project: 'स्थानिक लोकांना विश्वासात घ्या, विरोध असेल तर...', शरद पवारांनी दिला उद्योगमंत्र्यांना सल्ला

अजित पवार राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपमध्ये जाणार अशी चर्चा मागील काही दिवस सुरु होती. मात्र अजित पवारांनी आपण मरेपर्यंत राष्ट्रवादीचं राहणार असं स्पष्ट केलं.अशी बॅनरबाजी करुन महाविकास आघाडीमध्ये दबाव तर टाकला जात नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com