Yamuna Expressway Accident ANI
देश विदेश

Bus Accident : यमुना एक्सप्रेस वेवर बसला भीषण अपघात; ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २२ जखमी

या भीषण अपघातात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २२ हून अधिक प्रवासी जखमी झाले.

Satish Daud

Yamuna Expressway Accident News : दिल्लीहून बिहारच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट डिव्हायडरला धडकली. प्रवाशांना काही कळण्याच्या आतच बसने दोन तीन वेळा पलटी मारली. या भीषण अपघातात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २२ हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही दुर्देवी घटना रविवारी पहाटेच्या सुमारास यमुना एक्‍स्‍प्रेसवर घडली. (Latest Marathi News)

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत्युमुखी पडलेल्या ३ प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजक असल्याचं बोललं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक दारूच्या नशेत होता. तो सुसाट वेगाने बस चालवत होता. त्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस यमुना एक्सप्रेस वेच्या दुभाजकावर आदळली. अपघातानंतर (Accident) यमुना एक्स्प्रेस वेवर मोठी आरडाओरड झाली. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांना अनेक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ गंभीर जखमींना आग्रा येथे रेफर करण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT