चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्यावर असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाहीये. सुनावणी प्रकरणी न्यायालयानं त्यांना समन्स बजावलं होतं, मात्र त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. यामुळे ही सुनावणी आता ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासह न्यायलायानं त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढलाय. (Latest News)
दरम्यान, २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात नेत्यांनी रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर असभ्य टिप्पणी केली होती. हा सत्कार समारंभ कार्यक्रम कटघर भागातील मुस्लीम पदवी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणी रामपूरचे वकील महंमद मुस्तफा यांच्या तक्रारीवरून सपा नेते आझम खान, डॉ. एसटी हसन, अब्दुल्ला आझम, फिरोज खान, आयोजक मुहम्मद अरीझ, रामपूरचे माजी अध्यक्ष अझहर खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
विशेष सरकारी वकील मोहनलाल विश्नोई यांनी सांगितले की, बुधवारी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान माजी खासदार जयाप्रदा यांना फिर्यादीच्या वतीने न्यायालयात हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवायचे होते. परंतु त्यांच्या वकिलाने स्थगिती अर्ज दिला. न्यायालयाने याप्रकरणी माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केलाय. न्यायालयानं ११ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.