Agra Crime News
Agra Crime News Saam TV
देश विदेश

Agra Crime News : लग्नात रसगुल्ला मिळाला नाही म्हणून घेतला तरुणाचा जीव, नवरीविनाच परतले वऱ्हाड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Agra Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथे एका लग्नसोहळ्यात रसगुल्ला न मिळाल्यावरून वर आणि वधूपक्षाकडील लोक परस्परांशी भिडले. त्यानंतर चाकूने वार करण्यात आले. यात जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे.

लग्नसोहळ्यात रसगुल्ला मिळाला नाही म्हणून वर आणि वधू पक्षाकडील लोकांमध्ये वाद झाला. त्यानंतर एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यात एकाचा मृत्यू, तर एक तरुण जखमी झाला. या घटनेनंतर नवरीविनाच वऱ्हाडाला परतावं लागलं. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला. (Crime News)

नेमकं काय घडलं?

आग्राच्या (Agra) एत्मादपूर परिसरात खंदौलीचा व्यापारी वकारच्या दोन्ही मुलांचे बुधवारी लग्न होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या आदल्या रात्री जेवण सुरू असताना पाहुण्यांमध्ये रसगुल्ल्यावरून वाद झाला. वरात पोहोचल्यानंतर वधूपक्षाकडील मंडळींनी वऱ्हाड्यांचे स्वागत केले. वरात पोहोचल्यानंतर तिथे रसगुल्ले दिले जात होते.

एका वऱ्हाड्याने एकापेक्षा जास्त रसगुल्ल्यांची मागणी केली. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने ते देण्यास नकार दिला. यावरून वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्हीकडील लोकांनी चाकूने वार करण्यास सुरुवात केली. तसेच एकमेकांवर खुर्च्या फेकल्या गेल्या.

नवऱ्यामुलीच्या घरी दुःखाचा डोंगर -

या घटनेत जखमी झालेल्या २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण जखमी झाला. या घटनेने वरपक्षाकडील मंडळी नाराज झाली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांची नाराजी कायम होती. लग्न न लावताच वरपक्षाकडील मंडळी परतली. या घटनेनंतर वधूच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला.

आग्रा पोलिसांनी सांगितले की, रसगुल्ल्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि शस्त्रांनी वार झाले. यात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण जखमी झाला. पीडित पक्षकारांकडून प्राप्त तक्रारीनुसार, पुढील कारवाई केली जात आहे. फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेतली जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast : सावधान! महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस; नाशिकसह ९ जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya: बुधवार या राशींसाठी खास, जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय लिहलंय

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट, तुमची रास?

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT