Uttar Pradesh Amethi News  Saam TV
देश विदेश

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

Satish Daud

Uttar Pradesh Amethi News

उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गौरीगंज परिसरात काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांनीच या वाहनांची तोडफोड केली, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. जेव्हा भाजप कार्यकर्ते वाहनांची तोडफोड करीत होते, तेव्हा पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, "पराभवाच्या भीतीने भाजपातील नेते घाबरले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमेठीत काँग्रेस जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली".

"पोलिसांसमोरच ही तोडफोड झाली असून त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या घटनेवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन तेथून हल्लेखोरांचा पाठलाग केला, मात्र भाजप कार्यकर्ते पळून गेले", असा आरोप काँग्रेसने केला.

"भाजपने आपला पराभव आधीच मान्य केला आहे, म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते असे नीच कृत्यांचा अवलंब करीत आहेत. मात्र, राहुल गांधी बब्बर शेर असून ते कोणालाच घाबरत नाही", असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

सध्या अमेठी लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून स्मृती इराणी या विद्यमान खासदार आहेत. यंदा काँग्रेसने त्यांच्याविरोधात किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी या जागेवरून राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT