Snake Attack Viral Video Saam TV
देश विदेश

Snake Attack : अरे बापरे! दारूड्याला चावताच सापाने गमावला जीव; पाहा धक्कादायक VIDEO

आजवर साप चावल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडलेल्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण कधी सापच मेला अशी घटना तुम्ही ऐकली आहे का?

Satish Daud

Snake Attack Viral Video : साप असं नावही ऐकलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. साप आणि माणसांत नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. तसं पाहता साप (Snake) मानवाचं कोणतंही नुकसान करत नाही. मात्र, जर माणसाने काही खोड काढली तर साप काही चावल्याशिवाय राहत नाही. आजवर साप चावल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडलेल्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण कधी सापच मेला अशी घटना तुम्ही ऐकली आहे का?

होय तुम्ही बरोबर ऐकलं, एका दारूड्या व्यक्तीने आपल्याला कोब्रा साप चावल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. दारूड्याने दावा केलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

हा सर्व प्रकार उत्तरप्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात घडला आहे. येथील एका जिल्हा रुग्णालयात एक दारूडा व्यक्ती पिशवीत कोब्रा सापाला घेऊन आला. त्याचे म्हणणे होते की सापाने त्याच्या पायावर आणि हातावर दोनदा चावल्यानंतर तो साप मेला. त्याने केलेल्या या दाव्याने डॉक्टरही चक्रावून गेले.

सलाद्दुीन मन्सूरी (वय ३५ वर्ष) असं या दारूड्या व्यक्तीचं नाव असून मन्सूरीने डॉक्टरांना सांगितले की जवळपास तीन फूट लांब कोब्राने त्याचा चावा घेतला आणि त्यानंतर तो साप मेला. आपल्याला विषावरील उतारा म्हणून इंजेक्शन देण्यात यावे असे त्याने डॉक्टरांना सांगितले.

दरम्यान, हा प्रकार खरा आहे की खोटा याची शाश्वती साम टीव्ही ते नाही. मात्र, व्हिडीओत अशाच प्रकारचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ kashyap_memer नामक इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. कुणी शॉकिंग तर कुणी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT