Mumbai Local Train Women Fight Video
Mumbai Local Train Women Fight VideoSaam TV

Women Fight Video : अरे कुणी आवरा यांना! धावत्या लोकलमध्ये महिलांची पुन्हा कुटाकुटी

तिघींमध्ये झालेला वाद इतका विकोपाला जातो की त्या एकमेकींवर तुटून पडतात.
Published on

Women Fight Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. आजकाल सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जागेवरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं होतं. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. (Mumbai Local Train Women Fight Video)

Mumbai Local Train Women Fight Video
१६ वर्षाची मुलगी लग्न करू शकते का? सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

आता अशाच काहीशा प्रकाराचा एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन महिला एकमेकींना मारहाण (Women Fight) करताना दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ बघून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी असते. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास चाकरमानी ऑफिसला येत जात असल्याने ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे रोज कुणाचे ना कुणासोबत लोकलमध्ये खटके उडत असतात. अशावेळी काही लोक समजूतदारपणे घेतात. तर काही लोक हातघाईवरच असतात. त्यातून पुढे मारामारीचे प्रकार समोर येतात. या प्रकाराचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

लोकल ट्रेनमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तीन महिला एकमेकींसोबत जागेवर बसण्यावरून वाद घालताना दिसत आहे. जागेवरून तिघीही एकमेकींसोबत जोरदार वाद घालत आहे. तिघींमध्ये झालेला वाद इतका विकोपाला जातो की त्या एकमेकींवर तुटून पडतात.

व्हिडीओत आधी दोन तरुणी बसायच्या सीटवरून आपआपसात भिडल्या. एकीने दुसरीच्या झिंज्या उपटल्या तर दुसरीने पहिलीच्या कानाखाली मारली. हे पाहून तिसरी महिला या भांडणात आली आणि दोघींनी मिळून पहिल्या तरुणीला बेदम चोप दिला. इतकंच नाही तर, या वाहत्या गंगेत इतर महिलांनीही हात धुवून घेतला.

दरम्यान, 31 सेकंदाचा हा व्हिडीओ नेमका कोणत्या ट्रेनमधला आणि कधीचा आहे? हे अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र, हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर आयडीवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. लोकल ट्रेनमध्ये जागेसाठी दोन महिलांमध्ये झालं क्लेश, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com