UP Marriage Fraud:  saam tv
देश विदेश

UP Marriage Fraud: सामूहिक विवाह सोहळ्यात अजब प्रकार, चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न; संतापजनक कारण समोर

Gangappa Pujari

Uttar Pradesh News:

उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराजगंजमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात चक्क बहिण भावानेच सात फेरे घेतल्याची घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh News) मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचा विषय ठरला तो या योजनेदरम्यान भाऊ-बहिणीचा झालेला विवाह. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गंत सरकारकडून लग्नानंतर जोडप्यांना काही रक्कम दिली जाते. तसेच काही संसारपयोगी सामानही दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क भावा- बहिणीचेच लग्न लाऊन दिल्याचा अजब प्रकार समोर आता समोर आला आहे. लग्नानंतर मिळालेल्या पैशाच्या आणि घरातील वस्तूंच्या लालसेपोटी मध्यस्थांनी भाऊ-बहिणीचे लग्न लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार समोर येताच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लग्नाचे साहित्य परत मिळवले आहे. तसेच अनुदान म्हणून देण्यात येणाऱ्या ३५ हजार रुपयांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत महाराजगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये ५ मार्च रोजी ३८ जोडप्यांचे लग्न झाले. यामध्ये आधीच विवाहित महिलेचीही नोंद करण्यात आली होती. तिचा नवरा कमाईसाठी घराबाहेर गेला होता. यानंतरही मध्यस्थांनी तिला लग्नासाठी तयार केले. मात्र महिलेला लग्नासाठी बोलावलेला मुलगा आला नाही. यानंतर मध्यस्थांनी पैशासाठी महिला आणि तिच्या भावाचे लग्न लावून दिले. या धक्कादायक प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT