Horrific Accident  Saam tv
देश विदेश

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Horrific Accident update : उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

Mainpuri Road Accident : उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जीटी रोड हायवेवर भीषण अपघात झाला. भरधाव कार ट्रकला धडकल्यानंतर दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

कुटुंब आग्रा येथून वाढदिवासाची पार्टी झाल्यानंर कुटुंब घरी परतत होतं. अपघातानंतर वाहनांची रस्त्यावर लांबच लांब रांग लागली. दुर्घटनेनंतर जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अपघातानंतर वाहतूक कोंडी सुरळीत केली.

अपघातामुळे कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचे चक्क दोन तुकडे झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, कार आणि ट्रकचा अपघात झाल्याची सूचना मिळताच पोलीस पोहोचले. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. कारमधील लोक आग्रा येथून छिपरामऊ येथे जात होते. पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून मृतांचे मृतदेह रुग्णालयात पाठवले.

३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कार रस्त्यावरील खड्ड्यात उलटली. भीषण अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

Maharashtra Live News Update: पुण्यातील शेकोटी बंदी असताना अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

SCROLL FOR NEXT