Maharashtra Politics : शिंदे गटात प्रवेश केलेले तेजस ठाकरे आहेत तरी कोण? जाणून घ्या

tejas thackeray : यवतमाळमधील भाजप कार्यकर्ते तेजस ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तेजस ठाकरे यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
tejas thackeray News
tejas thackeray Saam tv
Published On

Who is tejas thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने जोरदार मोर्चेंबांधणी सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून शिंदे सेनेत इनकमिंग सुरु आहे. शिंदे गटात काल देखील पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून येताच विरोधकांना मोठा दणका दिला आहे. यवतमाळच्या तेजस ठाकरेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यात तेजस ठाकरे यांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची पक्षातील नेत्यांनाही कल्पना नव्हती. एकनाथ शिंदे यांनी काल अचानक दिल्ली गाठली. दिल्लीतून रात्री उशिरा परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी यवतमाळच्या नेर आणि महागाव तालुक्यातील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी तेजस ठाकरे नावाच्या पदाधिकाऱ्यानेही धनुष्यबाण हाती घेतलं.

tejas thackeray News
Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

कोण आहेत तेजस ठाकरे?

शिंदे गटात प्रवेश केलेले पदाधिकारी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस उद्धव ठाकरे नाहीत. तर ते यवतमाळच्या महागांवमधील भाजप कार्यकर्ते तेजस गोविंद ठाकरे आहेत. याच तेजस गोविंद ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. तेजस ठाकरेंसह अनेक कार्यकर्त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे शिंदेसेनेला महागांव शहरासह तालु्क्यात नवसंजीवनी मिळेल, अशा विश्वास नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कोणीकोणी केला पक्षात प्रवेश?

शिंदे गटात यवतमाळमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सुनीता जयस्वाल, विनिता मिसळे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप मस्के, उबाठा अल्पसंख्याक आघाडीचे रिझवान खान, माजी नगराध्यक्ष संतोष बोडेवार, माजी उपसभापती अभय डोंगरे, राहुल देहणकर, साजिद शरीफ, माजी नगरसेविका सरिता मुने, विलास ठाकरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दर्शना इंगोले, राकेश नेमनवार, अविनाश देशमुख, तेजस ठाकरे, रुपेश ठाकरे, अमोल जाधव, निलेश भारती, विक्रम झाडे, शुभम राठोड यांचा समावेश आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com