Kanpur live-in partner murder case updates : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ३५ वर्षाच्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह बेडमध्ये कपड्याच्या खाली लपवून ठेवण्यात आला होता. घराच्या दारातून रक्त वाहू लागल्यानंतर हत्येचा थरार समोर आला. दारातून रक्त पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् भयानक हत्याचे उलगडा झाला. ३५ वर्षाची महिला एका व्यक्तीबरोबर लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्या महिलेसोबत राहणारा तरूण फरार असून पोलिसांकडून शोध घेतला जातोय. (Woman’s body hidden under bed in Kanpur house)
कानपूरमधील रायपुरवा येथील लक्ष्मीपुरवा परिसरात ही थरारक घटना घडली. मृत महिलेचे नाव भारती असल्याचे तपासातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपासून भारती एका तरूणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. शेजार्यांनी पोलिसांना सांगितले की मागील पाच दिवसांपासून घर बंद आहे. त्यामुळे दुर्घटना झाली असल्याचे अथवा काही घडल्याची कोणतीही शंकाच आली नाही.
भारती हिच्या घराच्या दारातून काही लोकांना रक्त आलेले दिसले. हे दृश्य पाहून अनेकांच्या पायाखालील जमीनच सरकली. एका व्यक्तीने घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ रायपूरवा पोलिसांना सूचना दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता त्यामुळे पोलिसांनी तोडून प्रवेश केला. घरातील दृश्य पाहून पोलीसही सून्न झाले. घरात जिकडे तिकडे रक्ताचा सडा पडलेला होता. मृतदेह बेडच्या खाली कपड्यात लपवून ठेवलेला होता.
या घटनेपासून भारतीचा लिव्ह-इन पार्टनर फरार आहे. त्यामुळेच पोलिसांना त्याच्यावर हत्येचा संशय निर्माण झाला. पोलिसांनी भारतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून ते पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवलाय. या प्रकऱणाचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.