Mumbai Airport accident : मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना, २५ फूट उंचीवरून कर्मचारी कोसळला, जागीच मृत्यू

Mumbai Airport death case : मुंबई विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट तपासत असताना ३० वर्षीय कर्मचारी २५ फूट उंचीवरून पडून ठार. दुर्गेश पांडे नावाच्या कर्मचाऱ्याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्याची नोंद केली आहे.
Mumbai Airport death case
Mumbai Airport tragedy: 30-year-old employee dies after falling from 25 feet during conveyor belt inspection
Published On

Mumbai airport conveyor belt inspection accident : मुंबई विमानतळावर ३० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट तपासत असताना टेक्निकल सूपरवायझर २५ फूट उंचीवरून खाली कोसळला अन् जागेवरच मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी ही दुर्घटना घडली होती. विमानतळावर काम काम करणाऱ्या त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव दुर्गेश पांडे असे होते. तो अंधेरी पूर्वे भागात राहात होता. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती नोंद केली आहे.

Mumbai Airport death case
Local Body Election : मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर, ८ दिवसात बिगुल वाजणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश पांडे हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत होता. तो मामा सुजित कुमार ओझा यांच्या मालकीच्या प्रभात असोसिएट्स स्टोअरमध्ये टेक्निकल सुपरवायधर म्हणून काम करत होता. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४:४५ वाजता अपघात झाला. दुर्गेश हा सहकारी दिलीपकुमार सरन यांच्यासोबत बेल्ट मार्ग तपासणीचे काम करत होता. त्यासाठी लेव्हल २ वरील फॉल्स सीलिंगवर गेला होता. तपासणी करत असताना दुर्गेश पांडे याचा २५ फूट उंचीवरून तोल गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Mumbai Airport death case
Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

दुर्गेश पांडे याला उपचारासाठी तात्काळ विले पार्ले (पश्चिम) येथील नानावटी रुग्णालयात दाखल गेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण दुखापत गंभीर असल्याने त्याचा जीव गेला. सहारा पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Airport death case
अमेरिकेत सर्वात मोठा घोटाळा, भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ४००० कोटींच्या लोन फ्रॉडचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com