Local Body Election : मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर, ८ दिवसात बिगुल वाजणार?

Maharashtra Local Body Election News : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. ३ टप्प्यांत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका. १५ ते २० जानेवारीदरम्यान मुंबई महापालिका निवडणूक अपेक्षित. आचारसंहिता लवकरच लागू होणार.
Maharashtra Local Body Election News
Maharashtra Local Body Polls: Election Schedule Likely Next Week; Three-Phase Plan, BMC in JanuarySaam TV Marathi News
Published On

Maharashtra Local Body Election Date : महाराष्ट्रात लवकरच मिनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात निवडणूक आयोग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा (Maharashtra 3-phase local election schedule details) कऱणार आहे. राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे...तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक (BMC election January 2025 expected timeline update) होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

Maharashtra Local Body Election News
Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा? When will Maharashtra local body elections be announced

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आयोगकाडून पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा प्लान आयोगाकडून आखण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल.

Maharashtra Local Body Election News
Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

कोणत्या टप्प्यात कोणत्या निवडणुका ? Municipal, ZP & Panchayat Samiti election date Maharashtra

मागील पाच ते सात वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुका झाल्याच नाहीत. मुंबई मनपाची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जानेवारी २०२६ च्या आधी (Supreme court deadline local body elections Maharashtra) राज्यातील सर्व निवडणुका आयोगाला घ्यायच्या आहेत. त्यानुसार, आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर पुढील २१ दिवसांतच निवडणुका पार पडणार असून तत्काळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत. अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. २९ मनपाच्या निवडणुका होणार आहे. बीएमसीच्या निवडणुका स्वतंत्र होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Local Body Election News
Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

राज्यातील निवडणुका कधी होणार ?

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होतील. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना अथवा मतदानानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील.त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशी हाती घेतली जाईल.

Maharashtra Local Body Election News
अमेरिकेत सर्वात मोठा घोटाळा, भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ४००० कोटींच्या लोन फ्रॉडचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com