Uttar Pradesh Jhansi crime news Saam Tv News
देश विदेश

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

Brother killed Sister on Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीची गळा आवळून हत्या. मृत तरुणी आणि प्रियकरावर दुहेरी खून प्रकरण. आरोपी भाऊ आणि साथीदार पोलिसांच्या ताब्यात.

Bhagyashree Kamble

  • रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीची गळा आवळून हत्या.

  • मृत तरुणी आणि प्रियकरावर दुहेरी खून प्रकरण.

  • आरोपी भाऊ आणि साथीदार पोलिसांच्या ताब्यात.

  • घटनेमुळे गावात खळबळ उडाली.

प्रेम प्रकरणावरून भावानं आपल्याच बहिणीची रक्षाबंधनाच्या दिवशी निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील गरौठा भागात घडली. भावानं आधी बहिणीच्या प्रियकराला नोकरीचं आमिष दाखवून संपवलं. नंतर बहिणीचा गळा आवळून हत्या केली. बहिणीचा मृतदेह सापडल्यानंतर तिचं मुंडन केल्याचं आढळलं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी २ आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

कुमारी सहोदर उर्फ पुत्ती (वय वर्ष १८) असे मृत तरूणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुत्तीचे विशाल (वय वर्ष १९) नावाच्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचं प्रेमसंबंध तरूणीच्या भावाला खटकत होतं. कुटुंबियांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी पुत्ती आणि विशालनं पळून जाऊन लग्न केलं.

परंतु नातेवाईक आणि गावातील वृद्धांनी मध्यस्थी केल्यानंतर पुत्ती आणि विशालच्या कुटुंबामध्ये समेट झालं. या नात्याला कुटुंबाने स्वीकारलं. ज्यामुळे पुत्तीचा भाऊ आरोपी अरविंद खूप संतापला. काही दिवसांपूर्वी अरविंद पुण्याहून गावी परतला. परत आल्यानंतर त्यानं प्रकाश प्रजापतीशी हातमिळवणी केली. दोघांनीही मारण्याचा कट रचला.

७ ऑगस्ट रोजी सकाळी दोघांनीही विशालला नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. नंतर त्याची हत्या केली. नंतर रक्षा बंधनाच्या दिवशी अरविंदनं बहिणीचीही गळा आवळून हत्या केली. विशालचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या वडिलांनी अरविंद आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस तपासात रविवारी सकाळी चंद्रपुरा गावातील दादा महाराजांच्या प्लॅटफॉर्मजवळ पुत्तीचा मृतदेह सापडला. तिचं टक्कल करण्यात आलं होतं. पोलिसांनी तक्रारीनुसार, तपास करीत अरविंद आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं असून, चौकशीला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Kolte Net Worth: बिग बॉस विजेती तन्वी कोलतेची एकूण संपत्ती किती? कशी कमावते इतका पैसा? जाणून घ्या

Hingoli: सरकारी कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, तरुणाने संपवलं आयुष्य; हिंगोलीत खळबळ

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, इंजिनिअरने २ दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये हळदीची आवक वाढली

High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा शरीरात साचतंय खराब कोलेस्ट्रॉल, वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT