Rape Case Saam TV
देश विदेश

२ भावांसोबत नवऱ्याचा बायकोवर बलात्कार, नको तसले व्हिडिओही काढले अन्...

Uttar Pradesh crime news : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका महिलेने नवरा आणि त्याच्या भावांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

Saharanpur woman complaint against husband and in-laws case details : नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. नवऱ्याने आपल्याच पत्नीवर दोन भावांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तिन्ही आरोपींनी या कृत्याचा अश्लील व्हिडिओ बनवून पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या (SSP) आदेशानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका विवाहित महिलेने नवरा आणि त्याच्या भावांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेचा आरोप आहे की, सामूहिक बलात्काराला तिने विरोध केला, त्यावेली नवरा आणि दोन भावांनी अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाजीरवाणे कृत्य केले. एसएसपींच्या आदेशानुसार पोलिसांनी तिन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

२०१३ मध्ये पीडितेचं लग्न झाले होते. लग्नानंतर नवऱ्यासोबत ती गुजरातमध्ये राहत होती.त्यानंतर काही दिवसांनी सहारनपूरला राहायला आली. पतीचे दोन भाऊ तिच्या घरी वारंवार येऊ लागले आणि तिचा छळ करू लागले. एके दिवशी आरोपी तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला, असा आरोप त्या महिलेने केला आहे.

विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. या घटनेत तिचा पतीदेखील सामील आहे. पीडितेने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आलेय. आरोपी जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्या महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT