Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: स्विमिंग पूलमध्ये धम्माल, घरी जाताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा जागीच मृत्यू, शेवटचा VIDEO व्हायरल

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांचा अपघातापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ५ जणांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

या पाचही जणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. स्विमिंग पूलमध्ये धम्माल केल्यानंतर घराकडे परत जात असताना अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीकनगर माजिदपुरामध्ये राहणारा दानिश आपल्या दोन मुली आणि भावाच्या दोन मुलांना घेऊन फिरायला गेला होता. बुधवारी हे सर्वजण एकाच बाईकवरून मुर्शीदपूर येथील स्विमिंग पूलवर मजा करण्यासाठी गेले होते. याठिकाणी मजामस्ती केल्यानंतर रात्री १० वाजता हे सर्वजण घराकडे परत निघाले होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. मेरठ-बुलंदशहर महामार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.

या अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या पाचही जणांना ट्रकने चिरडले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दानिश (३६ वर्षे), त्याची मुलगी समायरा (५ वर्षे) आणि माहिरा ( ६ वर्षे), भावाची मुलं समर (८ वर्षे) आणि माहिम (८ वर्षे) या सर्वांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT