Accident News
Accident NewsSaam tv

Accident News : भरधाव डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेले चाक, तरुणीला कायमचे अपंगत्व

Pimpri Chinchwad News : भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हि खाली पडली. यानंतर डंपरचे पुढचे चाक स्वरा हिच्या पायावरून गेले. यात पायाचा चुराडा झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली
Published on

पिंपरी चिंचवड : भरधाव अवजड डंपर चालकाने दुचाकीस्वार तरुणीला धडक दिल्यानंतर अंगावर डंपरचे चाक गेले. त्यात तरुणीचा पाय चाकाखाली सापडल्याने पाय निकामी झाला आहे. सदरचा अपघात पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील अंडरपास समोर घडला आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता. यामुळे मार्गावरील वाहतूक देखील बराच वेळ खोळंबली होती. 

पिंपरी चिंचवडच्या ताथवडे अंडर बायपास जवळ हा अपघात घडला असून या अपघातात स्वरा संजय पवार (वय ३६) हि जखमी झाली आहे. दरम्यान स्वरा पवार हि मोपेड दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हि खाली पडली. यानंतर डंपरचे पुढचे चाक स्वरा हिच्या पायावरून गेले. यात तिच्या पायाचा चुराडा झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली.  

Accident News
Jalgaon Accident : मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

चालक पसार झाल्याने तरुणी अर्धा तास चाकाखालीच 

दरम्यान घटनेनंतर चालक डंपर तसेच सोडून पळून गेला होता. यामुळे साधारण तब्बल अर्धा तास तरुणी डंपरच्या चाकाखाली विव्हळत पडली होती. यावेळी नागरिकांची देखील गर्दी झाली होती. मर तिला बाहेर काढता येणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर साधारण अर्ध्या तासाने या तरुणीला चाका खालून बाहेर काढण्यात आले होते. 

Accident News
Kalyan Police : हरवलेले ७२ मोबाईल नागरिकांना परत; कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

अति रक्तस्राव झाल्याने पाय निकामी 

दरम्यान बराच वेळ तरुणी चाकाखाली असल्याने तिला वेळेत उपचार मिळू न शकल्याने तसेच अति रक्तस्त्राव होऊन तिचा डावा पाय निकामी झाला आहे. यामुळे डॉक्टरांना कमरेपासून पाय काढावा लागल्याने तरुणीला कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान या तरुणीवर थेरगावातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी डंपर चालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com