देश विदेश

Blast in Firecracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात अनेक कुटुंबावर दु:खांचा डोंगर

blast in firecracker factory at uttar pradesh : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने ऐनगणेशोत्सवात अनेक कुटुंबावर दु:खांचा डोंगर कोसळलाय.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौत एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक लोक जखमी झाले. स्फोटातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. रिपोर्टनुसार, फटाक्यांचा कारखाना बेकायदेशीर असल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे. तर काहींनी २ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुर्सी रोडवरील गुंडबा येथील बेहटा गावात ही भीषण स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचून बचाव पथकांनी बचाव कार्य सुरु केलं. अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फटाक्यात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या उपचाराची योग्य ती व्यवस्था करण्याचेही आदेश दिले. योगी आदित्यनाथ यांनी जखमींविषयी विचारपूस केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री कार्यालयानेही स्फोटाबाबत माहिती दिली. लखनौमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना मुख्यमंत्र्यांनी व्यक्ती केली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर छत कोसळलं. त्यात ५ लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यांनी जमखींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा मॅजिस्ट्रेटसहित अनेक वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. तिघे किरकोळ जखमी आहेत. भीषण स्फोटामुळे आजूबाजूंच्या घरांचं नुकसान पोहोचलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT